रमेश बनसोडे यांची 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

कोरोनाच्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांकडे मोकळा वेळ होता या काळात व्हॅटअप, फेसबुक,इन्स्टाग्राम, आदी सोशल मीडियावर अनेकांनी आपला वेळ घालविला मात्र रमेश बनसोडे यांनी या वेळेचा सदुपयोग करीत जगातील टॉप च्या विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयात तब्बल 70 सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण केले आहेत.कॅरिअर डेव्हलपमेंट कॉलेज लंडन, द ओपन युनिव्हर्सिटी यूके, कॉर्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूट कॅनडा, युरोपियन ओपन युनिव्हर्सिटी जर्मनी येथून हॉटेल मॅनेजमेंट,टाईम मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, मानसशास्त्र, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ग्रोथ माईंड सेट,ब्लॉग ऑथोरिटी, बेसिक न्यूट्रेशन,सायबर क्राईम,संस्थात्मक वर्तन आणि मानव संसाधन व्यवस्थापन, सोशल मीडिया मार्केटिंग,द सायकॉलॉजी ऑफ सायबर क्राईम,इन्व्हेस्टमेंट रिस्क,क्राईम्स ऑफ द पॉवरफुल, द प्रॉब्लेम विथ क्राईम,हुमन राईट अँड लॉ, बँकिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस,ब्रँड मॅनेजमेंट,इन्वेस्टिंगेशन सायकॉलॉजी, इंटरनॅशनल फायनान्स,इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट,डिजिटल मार्केटिंग, इफेकटिव्ह कमुनिकेशन,डाटा एन्ट्री,आदी सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण करून रमेश बनसोडे यांनी ऑनलाईन ई-लर्निंग क्षेत्रात उत्कृष्ट अशी भरीव कामगिरी करून एक वेगळी ओळख निर्माण केली असून एक नवीन रेकॉर्ड केला आहे. त्याची जागतिक स्तरावर 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. रमेश बनसोडे यांच्यावर सर्व स्तराहुन शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.

Leave a Reply