भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विटकरत स्वत : माहिती दिली आहे. विखे पाटील विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील विखे पाटील रुग्णालयात कोविड टेस्ट केली . तसेच संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असं आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, शिर्डी)

Leave a Reply