जनसेवा फौंडेशनचा उपक्रम दिशादर्शक – जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी यांची लोणीच्या स्वयंसिध्दा याञेत भेट

लोणी येथे सुरु असलेला स्वयंसिध्दा यात्रा राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव २०२१हा महीलांसाठी दिशादर्शक असून या माध्यमातून महीलांना मोठी प्रेरणा मिळत आहे. महीला बचत गटांना देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जनसेवा फौडेशन,लोणी मार्फत महीलांसाठी.होत असलेले काम जिल्हा साठी गौरव प्राप्त असेच आहे असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगत ही स्वयंसिद्धा यात्रा महीलासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. शासकीय योजना राबविण्यासाठी या गटांचा सहभाग महत्वपूर्ण आहे असे सांगून माजीमंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील,खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले काम आणि या बचत गटांसाठी शासन देखील आपल्या सोबत आहे.असे सांगितले. प्रत्येक स्टॉलला भेट देत त्यांनी महीलांचे कार्य जाणून घेतले.
” जनसेवा फौडेशन मार्फत बचत गट आणि महीला स्वयंपूर्ण होत आहे. पर्यावरण पुरक अगरबत्ती, धूप, अष्टगंध, शिसपेन्सिल यास व्यापक बाजारपेठ देण्याबरोबरच गटांना सर्वातोपरी सहकार्य करून जिल्हात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
रविवार पासून सुरु झालेल्या या महोत्सवामध्ये महीलांनी सुरु केले व्यवसाय,विविध मसाले,हळद उद्योग,पापड-लोणची,विविध शोभेच्या वस्तु,प्रक्रिया उद्योग आदीसह वडापाव,बेकरी पदार्थ,कर्जतची प्रसिध्द आमटी,पिठं-भाकर,खादेशी मांडे,शेवंती असे अनेक खाद्य पदार्थाचे स्टाॅल या प्रदर्शनात आहे रविवार पर्यत सुरु असलेल्या प्रदर्शात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


जनसेवा फौडेशन लोणी, पंचायत समिती, राहाता आणि कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार पासून सुरू झालेल्या स्वयंसिद्धा याञा राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव – २०२१ ला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भेट देऊन येथील बचत गटांकडून माहीती जाऊन घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता तालुका कृषि अधिकारी डाॅ.बापूसाहेब शिंदे, जनसेवा फौडेशनचे सचिव डॉ. अशोक कोल्हे, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड, माजी उपसरपंच अनिल विखे, गणेश विखे, भाऊसाहेब विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे आदीसह बचत गटातील,महीला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, राहाता)

Leave a Reply