लोणी खुर्दमधील साईदर्शन मेडिकल शेजारील एटीएम फोडून मुद्देमाल लंपास,लोणी पोलिसांकडून तपास सुरू

राहाता तालुक्यातील लोणी खुर्दमधील वेताळबाबा चौकातील साई दर्शन मेडिकल शेजारील टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश एटीएम फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटून नेला. ही घटना रात्री 2.30 ते 3.00 वाजेच्या सुमारास घडली. चोरट्याने स्फोट करून एटीएम फोडल्याची माहिती समोर आली असून एटीएम शेजारील घरांची बाहेरून कडी लावून तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून घराशेजारील एटीएम फोडल्याची घटना घडली. एटीएम फोडल्याची माहिती नागरिकांना मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. एटीएम फोडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच घटनास्थळी भेट दिली असता एटीएम फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली.
सहाय्यक पोलीस उप अधीक्षक डॉ दीपाली काळे तसेच शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घडलेल्या घटनेचा लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदर दरोडेखोरांना पकडण्याचे लोणी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
(लखन गव्हाणे – लोणी प्रतिनिधी)

Leave a Reply