ती सात गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडण्याच्या निर्णय मागे घेण्यासाठी भाजपा युवामोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेली सात गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडण्याच्या निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
भाजयुमोच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची मुंबईत भेट घेवून सात गावांमधील ग्रामस्थांच्या मागण्याचे निवेदन आणि ग्रामपंचायतींनी याबाबत केलेल्या ठरावाच्या प्रती गृहमंत्र्याना सादर केल्या.याप्रसंगी भाजयुमोचे उतर नगर जिल्ह्याचे सचिव सचिन शिंदे,उपाध्यक्ष राहूल घोगरे, शरद आहेर,रविंद्र गाढे,एस पी.आहेर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आश्वी पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यापासून या भागातील गुन्हेगारी रोखण्यात यश आले आहे. या सातही गावातील ग्रामस्थांना आश्वी पोलीस स्टेशन हे अवघ्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असून पोलीस प्रशासकीय दृष्ट्या सुध्दा ही गावे जवळ असल्याची बाब शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये ही सात गावे समाविष्ट करण्याबाबत ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना अचानक या गावांबाबत शासनाने काढलेला आदेश गावांवर अन्यायकारक असून या निर्णयाविरोधात ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र असल्याची भावना शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.
कोणताही भौगोलीक सामाजिक विचार न करता या सातही गावांबाबत शासनाने काढलेला आदेश अतिशय अन्यायकारक असल्याने हा आदेश तातडीने मागे घ्यावा आशी मागणी या शिष्टमंडळाने गृहमंत्री ना.दिलीप वळसे यांच्याकडे केली आहे. (राहाता प्रतिनिधी – लखन गव्हाणे)

Leave a Reply