कोरोना संकटामुळे लोणी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने

कोरोना संकटामुळे लोणी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.प्रथमच ऑनलाईन पध्दतीने झालेल्या ग्रामसभेला ग्रांमस्थानी उत्फुर्तपणे उपस्थीती नोंदवली.
माजी आ.चंद्रभानदादा घोगरे पाटील सभागृहात लोणी खुर्दची ऑनलाईन ग्रामसभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनार्दन घोगरे होते.ग्रामसभेत मागील ग्रामसभेचे इतिवृत्तास मंजुरी व शासकीय विषय घेण्यात आले सरपंच श्री.जनार्दन घोगरे यांच्या परवागीने ऐनवेळी ग्रामस्थांनी नागरी सुखसुविध विशेषतः गटार योजना,पाणीपुरवठा,लाईट व्यवस्था याबाबत असलेल्या आडीआडचणी चे विषय मांडले त्यास सरपंच जनार्दन घोगरे यांनी समर्पक उत्तर दिली.सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत होणारे प्रस्तावित सर्व कामे तसेज माझी वसुंधरा अभियान 2.0,सन 2021-22 मधे सहभाग नोंदवणे, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई ,शबरी आवास योजना घरकूल प्रगतीचा आढावा घेण्यात आला करवसूली करणे बाबत चर्चा झाली याबाबत सविस्तर माहीती ग्रामविकास आधिकारी श्री गणेश दुधाळे यांनी दिली. सरपंच घोगरे यांनी सर्व सुचनाची दखल ग्रामपंचायत घेणार असल्याची ग्वाही दिली.शासनाचा शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी ई- पिकपाहणी मध्ये सहभाग घेण्याचे अवाहन सरपंच घोगरे यांनी केले. कोविड मुळे मृत झालेल्या नागरिकांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.या ग्रामसभेस रयत चे सदस्य एकनाथ घोगरे, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्रीकांत मापारी, मा.सरपंच उत्तमराव आहेर,आनिल आहेर, रणजित आहेर,आप्पासाहेब घोगरे,शिवाजी कुरुकुटे,मुन्ना आहेर, कैलास आहेर,दिपक घोगरे,दिलिप आहेर यांच्यासह उपसरपंच आर्चना आहेर सर्व ग्रामपंचायत सदस्य,शासकीय कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
गावातील अनेक ग्रामस्थ आज ऑनलाईन ग्रामसभेमुळे आपले प्रश्न मांडु शकले नसतील त्यानी ग्रामपंचायत मध्ये येवुन आपले प्रश्न सांगावे म्हणजे आपल्या प्रश्नाचे निरसन करुन उपाय योजना करता येईल.तसेच ग्रांमपंचायतीने सरपंच आपल्या दारी हे अभियान सुरु केले असुन कोविड नियमावली मुळे काही आडचणी येत आहेत.लवकरच या अभियानाद्वारे ग्रामंस्थाच्या घरापर्यत जावुन त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाणार आहे अशी माहिती लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांनी दिली.
(लखन गव्हाणे – लोणी प्रतिनिधी)

Leave a Reply