अखिल भारतीय वारकरी मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्त

अखिल भारतीय वारकरी मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्त झाली असून ह.भ.प.अनिल महाराज वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे, ह.भ.प. राम महाराज, ह.भ.प.विवेक महाराज केदार.,ह.भ.प.पोपट महाराज आगलावे, मा.सभापती विठ्ठलराव चासकर, शांताराम पापळ, बाळासाहेब भांगरे, आत्माराम शेळके, रामचंद्र वावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
समशेरपुर येथील ह.भ.प.तुकाराम महाराज जाधव यांना अध्यक्ष आणि ह.भ.प.दिपक महाराज एखंडे यांच्याकडे वारकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.
अकोले तालुक्यातील वारकरी मंडळीच्या उपक्रमासाठी शहरात एक भव्य दिव्य वारकरी भवन आणि वारकरी वाचनालय उभारण्यात सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली. श्री विठ्ठलराव चासकर यांनी तालुक्यात भव्य किर्तन महोत्सव आयोजित करणार आहे अशी माहिती दिली.
अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.अनिल महाराज वाळके आणि ह.भ.प.विवेक महाराज केदार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या किर्तन परंपरेने सर्व जगात क्रांतीसह शांती नांदेल असे मनोगत व्यक्त केले.
ह.भ.प.दिपक महाराज एखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आणि शेवटी पसायदानाने सांगता झाली.

Leave a Reply