संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच… आजही जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण संगमनेरमध्ये

संगमनेरमध्ये कोरोनाचा कहर वाढतच असून शुक्रवारीही अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका कोरोना रुग्णसंख्येत पहिल्या क्रमांकावर राहिल्याचं पाहायला मिळालं. एकतर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरु झालेत. बाजारपेठेमध्ये पुन्हा गर्दी होत असल्याने हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता असून सध्या पावसाने चांगलंच मनावर घेतल्याने वातावरणातील बदल कोरोनाला खतपाणी घालत असल्याने नागरिकांनी फार काळजीने वागणे गरजेचे आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये कोरोनाची संख्या वाढलेलीच असल्याने आपण नियम पाळणे फार गरजेचे आहे. आज शुक्रवारी संगमनेर १४४, अकोलेमध्ये ४६, राहुरी ३१, श्रीरामपूर २१, महानगरपालिका हद्दीत ३९, पारनेरमध्ये ४८, पाथर्डी ५०, नगर ग्रामीणमध्ये ५०, नेवासा ३६, कर्जत ३४, राहाता २०, श्रीगोंदा २८, कोपरगाव २९, शेवगाव ३५, जामखेड २५ आणि इतर जिल्ह्यातील १२ अशा एकूण ६५० जणांचे अहवाल जिल्ह्यात पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply