कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिली माती परीक्षणाची माहिती

शेतीविषयक शिक्षण घेत असलेले कृषीदूत यांनी संगमनेर तालूक्यातील हिवरगाव पावसा येथे माती परीक्षण प्रात्यक्षिक राबवले. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण करा हा संदेश कृषिदूतांतर्फे देण्यात आला. पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपुर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर 3 महिन्यांनी मातीचा नमुना द्यावा. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी दूतांकडून शेतकऱ्यांना देण्यात आला. याचबरोबर आजूबाजूचे नमुने घेऊन माती परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक जसे सेंद्रिय कर्ब, नत्र, स्पुरद आणि पालाश याबद्दल कृषिदूत धनंजय फटांगरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनिल गडाख, शुभम रहाणे, रमेश गडाख, आर्यन आव्हाड आदी शेतकरी उपपस्थित होते. या उपक्रमासाठी या विद्यार्थ्यांना के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार हाडोळे कार्यक्रम अधिकारी प्रा.परमेश्वरी पवार आणि सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *