कंटेनरखाली उडी घेऊन आरोपीची आत्म्हत्या… तर घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे राज्य उत्पादन शुल्क यांच्या ताब्यातील आरोपी जनार्दन बंडीवार याने कंटेनर खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना बाभळेश्वर हद्दीमध्ये घडली असून मृतांच्या नातेवाईकांनी घातपात केल्याचा आरोप राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यावर केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास लोणी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. तसेच मुताचे मेहुणे रवींद्र तालापल्ली यांनी असे सांगितले की माझ्या मेव्हण्यावर खोटा गुन्हा दाखल करून घातपात केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांची सीबीआय चौकशी व्हावी असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले असून माझ्या मेव्हण्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली आहे, पैसे दिले नाही म्हणून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप मयत जनार्दन बंडीवार यांचे मेहुणे रवींद्र तालापल्ली यांनी केला. तसेच मयत जनार्दन बंडीवार यांच्या मित्रांनी त्याचा घातपात झाला आहे असा आरोप राज्य उत्पादन शुल्क यांच्यावर केला आहे. नेमकी जनार्दन बंडीवार याने खरोखर आत्महत्या केली आहे का? का त्यांचा घातपात केला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची लवकरच सत्यता समोरील येईल असं आश्वासन वक्तव्य शिर्डी विभागाच्या डीवायएसपी संजय सातव यांनी दिलं आहे.
( प्रतिनिधी – लखन गव्हाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *