आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या समृद्ध शेतीची राज्यातील शेतकऱ्यांना भुरळ

संगमनेर तालुक्यातील निमज येथील प्रगतशील आणि आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतीतील अत्याधुनिक प्रणालीमुळे आणि दूरदृष्टी ठेवून घेत असलेल्या पीकपद्धतीमुळे त्यांनी शेतीतून आर्थिक सुबत्ता साधली असून त्यांनी आता आपल्या शेतीत 12 एकर झेंडूचं पीक घेतलंय. या पिकाची पाहणी करण्यासाठी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषि अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषि अधिकारी, आत्माचे वैभव कानवडे साहेब ,कृषि सहायक कल्याणी धांडगे आले होते. मान्यवरांनी गुंजाळ यांच्या सुयोग्य नियोजनात्मक शेती आणि पीक पद्धतीचे कौतुक करत तुकाराम गुंजाळ आणि कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. तुकाराम गुंजाळ हे एका मल्चिंग पेपरवरती वर्षभरात तीन पिके घेतात आणि यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून आर्थिक सुबत्ता साधत असतात. तर त्यांची शेतीपद्धती पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी याठिकाणी येत असतात आणि पीकपद्धतीची माहिती करून घेत असतात.आतापर्यंत त्यांना आदर्श गोपालक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेले आहेत.
तर यावेळी सांगवी गावचे उपसरपंच नवनाथ कातोरे, निमज ग्रामपंचायतचे सदस्य अरुण गुंजाळ व आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *