२८ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून गरोदर बनवणाऱ्यावर गुन्हा दाखल

लग्नाचे अमिश दाखवून सलग ५ वर्षे अत्याचार करणाऱ्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील नागेश कराळे याने संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील २८ वर्षीय तरुणीला ९ महिन्यांची गर्भवती देखील बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या तरुणीने खरेदी केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे, दुचाकी, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रेही नागेश कराळे घेऊन गेला. लग्नाचे वाचन दिल्यामुळे सादर तरुणी भरोशावर राहिली मात्र शेवटी तो पळून गेल्याने या पीडित तरुणीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत नागेश कराळेच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply