वनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडले

राहता तालुक्यामध्ये कार्यरत असलेले वनरक्षक कर्मचारी संजय मोहन सिंग बेडवाल वय 29 वनपरिक्षेत्राधिकारी यांनी लोणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की हुसेन दादाभाई शेख राहणार श्रीरामपूर हा फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत अनिल गोपीनाथ आढाव राहणार लोणी तालुका राहाता हा वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे तसेच तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबद्दल मला सर्व माहिती आहे अशी धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड करून बारा लाख रुपयांची मागणी केली. जर तू पैसे दिले नाही तर तुझे हात पाय तोडून तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याची फिर्याद लोणी पोलीस स्टेशन मध्ये दिली. लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संपर्क करून संपूर्ण माहिती सांगितली. त्यांच्या सूचनेनुसार लगेचच अपर पोलीस अधिकारी डॉ. दिपाली काळे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि दोन सरकारी पंच घेऊन खाजगी वाहनाने जाऊन श्रीरामपूर येथे सापळा रचला. नियोजनाप्रमाणे आरोपी हुसेन दादाभाई शेख याने तक्रारदार यांना राहत्या घरी बोलवून घेत रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपयाची खंडणी घेत असताना लोणी पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले. सरकारी पंचासमक्ष रोख रक्कम हस्तगत केली. वनरक्षक कर्मचारी संजय मोहनसिंग बेडवाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी हुसेन दादाभाई शेख,सालीम बाबमिया सय्यद दोघे रा. श्रीरामपूर आणि अनिल गोपीनाथ आढाव रा. लोणी खुर्द यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करत आहेत.
(राहाता प्रतिनिधी – लखन गव्हाणे)

Leave a Reply