लोणी पोलीस ठाण्यातील पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 3 महिला पोलीस आणि 7 पुरुष पोलीस यांना पदोन्नती देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील 503 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून यामध्ये लोणी पोलीस स्टेशनमधील दहा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 5 पोलीस हेडकॉन्स्टेबल 1 पोलीस नाईक 1 पोलिस कॉन्स्टेबल व 3 महिला कॉन्स्टेबल यांना बढती देण्यात आली आहे.
हेड कॉन्स्टेबल पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी ज्ञानेश्वर मरभळ, सुखदेव खेमनर, नारायण माळी, शिवाजी सोमासे यांची बढती झाली तसेच पोलीस नाईक पदावरून संपत जायभाये यांची निवड करण्यात आली आणि मनोज सनानसे, संगीता खेमनर, वैशाली मोरे यांची पोलीस नाईक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . अशी माहिती लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी आज दिली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांच्यासह सहकारी अंमलदारांनी बढती झालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
(लोणी प्रतिनिधी – लखन गव्हाणे)

Leave a Reply