राज्य सरकारच्याविरोधात आता युवकच रस्त्यावर उतरतील – बावनकुळे

भाजयुमोच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बावनकुळे आणि युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उतर महाराष्ट्रात संपर्क अभियानाची सुरवात केली असून राज्यातील आघाडी सरकार हे दुराचारी, भ्रष्टाचारी आणि अन्याय करणारे असून या सरकारच्या विरोधात युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. सरकारच्या विरोधात युवकांची ताकद युवा वाॅरियर्सच्या माध्यमातून उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त करतानाच आघाडी सरकार फक्त पुणे आणि मुंबई पुरते काम करते मंत्री फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरते उरले असल्याची टिका बावनकुळे यांनी केली. राज्यात भाजपचे सरकार असताना कधीही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. कधीही भारनियमनाचा त्रास झाला नाही. या सरकारने मात्र शेतकर्यांची वीज तोडली. ग्रामपंचायतीला वीज बील भरायला लावून वीज तोडण्याच्या नोटीसा दिल्या. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात असलेला रोष आता चव्हाट्यावर येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या अन्यायकारी सरकारच्या विरोधात युवकच आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असाही इशारा त्यांनी दिला. तसेच बावनकुळे यांनी सर्व युवकांशी संवाद साधून पक्षाच्या संघटनात्मक कामाची माहीती जाणून घेतली. पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात युवा वाॅरियर्स अभियान सुरू असून गावातील प्रत्येक प्रभागात तसेच वार्ड आणि वस्त्यांवर जावून युवकांना सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्राशी जोडून चांगला नागरीक घडविण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
(राहाता प्रतिनिधी – लखन गव्हाणे)

Leave a Reply