मुळा नदीला मध्यरात्री पुर; शिसवद आणि आंबीत गावातून इलेक्ट्रिक तारांसह शेतकऱ्यांच्या मोटारी गेल्या वाहून

अकोले तालुक्यातील खडकी, शिसवद, लव्हाळी आंबीत या भागात गेले चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू असुन यामुळे शुक्रवारी मुळा नदिला पुर आला आहे यात कुमशेत, पाचनई या भागातील शेतकऱ्यांचे शेती पंप वाहुन गेले आहेत. मुळा नदीला पूर आला असुन यात आज शिसवद,आंबीत ,लव्हाळी या भागातील काही शेतकर्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी, इंजिन ,पाईप ,स्टार्टर या सर्व वस्तू वाहून गेल्या आहेत. प्रचंड महागड्या अशा मोटारी, पाईप वाहून गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत. गेले 20 ते 25 दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर शेतकरीराजा चिंतेत होता. मात्र आता मुळा नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
(वृत्तसंकलन विभाग, अकोले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *