संगमनेर – पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख लाचलुचपतच्या जाळ्यात

संगमनेरमध्ये शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांच्यावर नाशिकच्या लाचलुचपत विभागाने छापा टाकला आहे. एका मिसिंगच्या प्रकरणात एक हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे.


संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अगदी मागच्या महिन्यात पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्यावर नाशिक लाचलुचपत विभागाने छापा टाकला होता .हे प्रकरण ताजे असतानाच आज सायंकाळी संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना एक हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्याचे काम सुरू आहे. संगमनेर शहरातील घोडेकर मळा परिसरात राहणारी तरुणी गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होती शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी ती मिळून आली त्यानंतर ही मिसिंग दाखल असल्यामुळे नातेवाईक संबंधित मुलीला घेऊन शनिवारी १2 डिसेंबर म्हणजेच आज रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आले. तपासी नाईक पोलीस बापूसाहेब देशमुख यांच्याकडे ही कागदपत्र होती.
ही मिसिंगची केस निकाली काढण्यासाठी त्यांनी 1 हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी नाशिकच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. यावेळी पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांना ही एक हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची महिन्यापूर्वीच या संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. आपल्याच पोलिसांनं लाच घेतल्यानं त्यांना ही सलामी ठरली की काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

(बाबासाहेब कडू – संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply