संगमनेर तालुका अतिवृष्टीत बसत नाही – तहसीलदार अमोल निकम

संगमनेर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार केल्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील 92 हजार 684 हेक्टर जमिनीवरील पिकाचे मोठे नुकसान झाला होते.
संगमनेर महसूल विभागाने पंचनामे करून राज्य शासनाकडे 17 कोटी 29 लाख 68 हजार रुपयांची मदत मागितली मात्र संगमनेर तालुक्यात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला नाही असं सांगत तहसीलदार अमोल निकम यांनी ही मदत मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली आहे.


संगमनेर तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली मात्र दीड महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अजून एक रुपयाचाही निधी मिळाला नाही जिरायत भागासाठी सात कोटी 80 लाख रुपये तर बागायती पिकांसाठी 7 कोटी 82 लाख रुपये तर फळपिकांसाठी जवळपास 2 कोटी रुपयांची नुसकान भरपाई मिळावी असा अहवाल संगमनेर महसूल प्रशासनाने शासनाकडे सादर केला मात्र अतिवृष्टी साठी शासनाचे काही निकष आहेत त्या निकषात संगमनेर तालुका बसला नसल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. तालुक्यात जे पर्जन्य मापक यंत्र बसवलेले आहे त्यावर या पावसाची 65 मिलिमीटरपेक्षा जास्त नोंद न झाल्याने ही मदत मिळेल की नाही याबाबत महसूल विभाग सध्यातरी अनभिज्ञ आहे.

Leave a Reply