संगमनेरमध्ये शरद पवारांच्या वाढदिवशी व्हर्च्युअल सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ,राष्ट्रीय नेते व महाराष्ट्रातील येष्ठ नेते खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मालपाणी लॉन्स येथे शनिवार दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9:30 वा. सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी दिली आहे.

 या बाबत माहिती देताना आबासाहेब थोरात पुढे म्हणाले की, खासदार शरदचंद्रजी पवार हे देशाचे नेते आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढणार्‍या या सर्वमान्य नेतृत्वाने  महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात मोठे अभूतपूर्व योगदान दिले आहे. देशातील शेतकर्‍यांचे नेते अशी ओळख असणारे खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. त्यानिमित्त संगमनेर तालुक्यात शनिवार दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता मालपाणी लॉन्स येथे राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात ,आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना ,कम्युनिस्ट पक्ष, पुरोगामी विचारांच्या सर्व संघटना व सर्व सेवाभावी संघटनांच्या वतीने भव्य व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन होणार आहे ..
यावेळी विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त होणार असून याप्रसंगी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण येथील होणार्‍या मुख्य कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण  केले जाणार आहे ..

अत्यंत नियोजनबद्ध आणि दिमाखदार पद्धतीने होणार्‍या या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात,  कार्याध्यक्ष दिलीपराव शिंदे शहराध्यक्ष प्रशांत वामन, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष कपिल पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कातारी, यांसह सर्व राजकीय पुरोगामी विचारांच्या संघटनांनी केले आहे.

(संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply