संगमनेरमध्ये शनिवारी २३ जणांना कोरोनाची लागण

शनिवारी १२ डिसेंबर रोजी संगमनेरमधील २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले असून ग्रामीण भागातील आश्वी बुद्रुकमधून सर्वाधिक 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेतून ७ तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून १६ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील ४७ आणि ५२ वर्षीय महिला, मोतीनगरमधील ५३ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, १६ वर्षीय युवती, आंबेडकरनगर मधील २९ वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथील ४२ वर्षीय पुरुष आणि गोविंद नगरमधील १६ वर्षीय युवक तर ग्रामीण भागातील आश्वी बुद्रुक येथील ४०, ५६, ४० वर्षीय महिला, २२ वर्षीय तरुण, ६९ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय बालिका, काकडवाडी येथील ६३ आणि ३५ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील २५ आणि ३८ वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील ३२ वर्षीय पुरुष, खराडी येथील ४५ वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथील ५५ वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
(वृत्तसंकलन विभाग,संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *