संगमनेरच्या धनगंगा पतसंस्थेच्या मॅनेजरने केला 48 लाख 60 हजार 278 रुपयांचा अपहार

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेमध्ये संस्थेचा मॅनेजर सचिन बजरंग कवडे राहणार घुलेवाडी याने 48 लाख 60 हजार 278 रुपयांचा अपहार केला आहे याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लेखापरीक्षक अजय केशव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पतसंस्थेच्या मॅनेजरने पदाचा दुरुपयोग करून बनावट दाखला तयार करत तसेच सोनेतारण कर्ज मध्ये अपहार करीत 48 लाख 60 हजार 287 रुपयांचा अपहार केल्याचं लेखापरीक्षण अहवालात दिसून आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करीत आहे तालुक्यात या पतसंस्थेत एवढा मोठा अपहार झाल्याने पतसंस्था क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
(प्रतिनिधी – बाबासाहेब कडू,सुखदेव गाडेकर, संगमनेर)

Leave a Reply