संगमनेरच्या ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षणाची सोडत १५ डिसेंबरला

संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महिनाअखेर किंवा पुढील वर्षीतील 2021 च्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत 15 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता संगमनेर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ही सोडत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली . तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग ,त्याच बरोबर खुला प्रवर्ग, महिला सरपंच आरक्षण यावर रोटेशन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे.
(बाबासाहेब कडू – संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *