संगमनेरचे लाचखोर पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांना आज न्यायालयात हजर करणार

संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बापूसाहेब देशमुख यांना एक हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आज अकरा वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. संगमनेर शहरातील घोडेकर मळा परिसरात राहणारी कापड व्यापाऱ्याची पत्नी गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होती. शुक्रवारी 11 डिसेंबर रोजी ती मिळून आली, त्यानंतर ही मिसिंग दाखल दाखल होती ती निकाली काढण्यासाठी देशमुख यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत विभागाने सापळा लावुन लाचखोर पोलिसाला शनिवारी गजाआड केलं.

(बाबासाहेब कडू – संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *