श्रीगोंद्यात भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील नगर – दौंड रोडवर पवारवाडी जवळ झालेल्या ट्रक व मोटारसायकल अपघातात लोणीव्यंकनाथ येथील मोटारसायकल स्वार चौघेजण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला .विशाल संतोष सोनवणे , राहुल बाजीराव बरकडे , राजकुमार विठ्ठल पवार , प्रतीक नारशीं शिंदे रा. पवार वस्ती, लोणी व्यंकनाथ येथिल हे मोटारसायकल वरून लोणी व्यंकनाथ गावात जात ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना नगर कडून साताऱ्या कडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली चौघेही जागीच ठार झाले आहेत.चौघेही मुल आई वडीलांना एकुलते एक होते. 
ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडले आणि पोलिस उपनिरीक्षक अमित माळी यांच्या ताब्यात दिले पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलिसांची टिम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
(गणेश कविटकर,श्रीगोंदा प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *