श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटीव्ह

विधानसभेचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी स्वतः जाहीर करत संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

पाचपुते काष्टी येथील निवासस्थानी क्वारन्टाईन झाले आहेत.विधिमंडळ अधिवेशन अनुषंगाने आमदार पाचपुते यांनी कोरोना टेस्ट केली त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. तर अहवाल येताच पाचपुते यांनी आपणास कोरोनाची कोणतीच लक्षणे नसून तब्येत ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले.


दरम्यान समर्थक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी देखील आमदार पाचपुते लवकर बरे होऊन जनसेवेत यावे अशी इच्छा व्यक्त करत प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. यातून श्रीगोंदयातील राजकारण हे क्षणिक असत याचे आदर्श उदाहरण समोर आले.


पाचपुते मागील काही महिन्यांपासून आजारी असतानाही विरोधी आमदारांचा पिंड स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी भाजपच्या सर्व आंदोलनात नेतृत्व करून प्रश्नांना वाचा फोडली उद्याच्या अधिवेशनात देखील ते सभागृहात प्रश्न मांडणार होते. परंतु कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने ते हजर राहणार नाहीत.
(गणेश कविटकर – श्रीगोंदा प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *