शेतकरी प्रश्नांसाठी शेवटचे आंदोलन करणार – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

राळेगणसिद्धी:- दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत करणार असा इशारा अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारला इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवशीय उपोषण सुरु केले आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी केला. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाही ही तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा हमी भाव दिला पाहिजे. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र त्याची अजूनही अंमलबजावनी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी एकदा दिल्लीत तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. दोन्ही वेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषी मुल्य आयोगाला स्वायत्तता मिळालेली नाही असा आरोप यावेळी अण्णांनी केंद्र सरकारला केला.

(पप्पू पायमोडे – पारनेर प्रतिनिधी)

Leave a Reply