शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी चांगदेव खेमनर

शिक्षक सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चांगदेव खेमनर यांचा संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या वतीने घारगाव येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव हिरालाल पगडाल, मीनाक्षी पगडाल, अण्णासाहेब ढगे, अनिल गायकर, कार्याध्यक्ष राघू जाधव, तज्ज्ञ संचालक संतोष टावरे, सचिन फटांगरे, भारत शेलकर आदी पठार भागातील शिक्षक कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
चांगदेव खेमनर हे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच घारगाव येथे येणार म्हणून तज्ज्ञ संचालक संतोष टावरे यांच्यासह शिक्षकांनी त्यांचा सत्काराचा छोटा कार्यक्रम आयोजित केला होता.
(नवनाथ गाडेकर, प्रतिनिधी – घारगांव, ता. संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *