राहुरीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या निवासस्थानावर जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरावर धडकणारा मोर्चा पोलिसांनी अडवून आंदोलकांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
करून आंदोलकांना सोडण्यात आलं आहे….प्रसंगी आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी स्वीकारल आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात राहुरी बस स्थानका पासून काढण्यात आला होता मोर्चा नवी पेठेत येताच पोलिसांनी मोर्चेकर्यांना ताब्यात घेतले या वेळी पोलीस व मोर्चेकर्यांत वादावादी झाली.
लाॅक डाऊन काळामधील पन्नास टक्के वीज बिल माफ करावे, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेतील जाचक अट रद्द करावी,खावटी अंतर्गत आदिवासी नागरिकांना मिळणाऱ्या कर्जाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, आदिवासी समाजाच्या घरकुलाच्या मागणीवर या सरकारने लक्ष घालावे यासह आदिवासी विभागातल्या तसेच महावितरण विभागतल्या वेगवेगळ्या मागण्या ऊर्जा राज्यमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरीतील निवासस्थानावर धडक मोर्चाचा आयोजन केलं होतं. मात्र राहुरी शहरातील मेन रोडवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. सदर आंदोलकांना पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करून आंदोलकांना सोडून देण्यात आल आहे .याप्रसंगी आंदोलनांनी घोषणाबाजी करत परीसर दनानुन सोडला होता.
आंदोलकांच्या विविध मागण्यासंदर्भात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुख अधिका-यांशी आंदोलकांची चर्चा करून बहुतांशी प्रश्न सोडविले जातील असं राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रतिनिधी तसेच तहसीलदार यांच्याकडून यावेळी सांगण्यात आल आहे.
सदर आंदोलनास विशाल कोळगे,जालिंदर घिगे ,विलास साळवेअरुण साळवे ,अनिल जाधव, वर्षा बाचकर, इंदुमती गायकवाड ,पिंटूनाना साळवे, बाबुराव मकासरे, विजय, गायकवाड, संदीप कोकाटे, दौलत पवार, आदिंसह वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(सुहास जाधव, शरद पाचारणे – राहुरी प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *