राहात्यात शेतकरी आंदोलनाला पाठींब्यासाठी कडकडीत बंद

केंद्र सरकारने लादलेल्या अन्याय कारक कृषी व शेती कृषी व कामगार कायद्याला विरोध करून दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहाता मतदारसंघ कडकडीत बंद पाळण्यात आला.
रायात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आला यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राहता येथे कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी झालेल्या केंद्र सरकारच्या विरुद्ध निषेध कार्यक्रमात सुरेश थोरात शिर्डी विधानसभा, इंद्रनाथ थोरात तालुका निरिक्षक, श्रीकांत मापारी सरचिटणीस जिल्हा काँग्रेस, शशीकांत लोळगे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र पठारे उपनगराध्यक्ष रा.न.पा, सागर लुटे नगरसेवक, बाळासाहेब गिधाड तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी सुधीर म्हस्के, कॉ एल.एम.डांगे, राजेंद्र निर्मळ युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, सचिन गाडेकर शहराध्यक्ष युवक काँग्रेस, अमृत गायके शहराध्यक्ष युवक काँग्रेस, सचिन चौगुले शिवप्रहार, रणजित बोठे,शाहरुख बागवान सरचिटणीस युवक काँग्रेस, प्रसाद शेळके सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस,भागवत लांडगे युवासेना शहर प्रमुख ,रणजित बोठे काँग्रेस ,लताताई डांगे महिला काँग्रेस अध्यक्ष ,विक्रांत दंडवते काँग्रेस सेक्रेटरी सागर लुटे नगरसेवक शिवसेना , समीर बेग राष्ट्रवादी उपशहर प्रमुख , मनसे उपतालुका अध्यक्ष रामभाऊ सदाफळ, मामा पगारे, संजय पगारे, मदन मोकाटे, सुनील जाधव, देवराम धनवटे, रतन अरणे, विनायक जांभुळकर, राजेंद्र वर्पे, सागर कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राहता मतदारसंघांमध्ये भाजपच्या वतीने आज सर्व व्यापार व दुकाने बंद ठेवण्यास सुरू ठेवण्यासाठी आव्हान केले होते मात्र येथील स्थानिक जनतेने केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक कामगार व कृषी कायद्याला विरोध दर्शवत आज भारत बंदला शंभर टक्के पाठिंबा दिला सर्व व्यापारी शेतकरी उद्योजक या बंदमध्ये सहभागी होत एक मुखी महा विकास आघाडी सरकारच्या पाठीशी उभे राहिले यावेळी सुरेश थोरात म्हणाले की भाजीपाल्याचे अन्यायकारक कायदे लागले आहेत त्यामुळे शेतकरी व कामगार उद्ध्वस्त होणार आहेत हे कायदे तातडीने मागे घ्यावी यासाठी काँग्रेस पक्षासह सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत केंद्र सरकारने शेतकर्‍यांना सन्मानपूर्वक वागणूक देत कायदे मागे घ्यावेत राज्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्‍यांचे सरकार असून या सरकारने सातत्याने जनमानसाच्या विकासाची कामे केली आहेत भाजपचे फसवे व जाहिरातबाजी लोक आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
(राहाता प्रतिनिधी)

Leave a Reply