राहाता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर .

राहता नगरपालिकेची अग्निशमन गेल्या 15 दिवसा पासून बंद आहे. आज शनिवारी सकाळी नितीन गाडेकर यांच्या ऊसाला आग लागली होती, त्यांनी राहाता नगरपालिकेला संपर्क केला असता अग्निशमन बंद असल्याचे सांगितले, त्यामुळे शेतकरी नितीन गाडेकर यांनी शिर्डी अग्निशमनला आग विझवण्यासाठी बोलविले त्यामुळे राहता येथील शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे साखर खाऊ घालून तोंड गोड करण्यात आले तसेच राहाता येथील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, युवासेना शहर प्रमुख भागवत लांडगे यांनी राहाता येथील बंद पडलेल्या अग्निशमनला हार घालून पूजा केली.
राहाता नगरपालिका फक्त पैसे गोळा करण्यात एक नंबर असते मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कायम मागे असते. असा आरोपही करण्यात आला. राहाता नगरपरिषदेची अग्निशमन चालू करण्यासाठी 1 तासाचे काम आहे असे चालक म्हणाले, तर 15 दिवसांपासून ती उभी का आहे ? नागरिकांचे घर संसार बरबाद झाल्यावर नगरपालिका जागी होणार का ? कधी ह्या निष्काळजी नगरपालिका प्रशासनाला जाग येणार ? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
(लखन गव्हाणे – राहाता प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *