राहातामध्ये आंदोलन करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांना अटक

राहाता तालुक्यातील शिर्डी येथे रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधात वक्तव्य केल्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना आज शिर्डी नगरपंचायत समोर विरोध प्रदर्शन करत असतांनाच त्यांना  पोलिसांनी अटक केली आहे. या विरोध प्रदर्शनास राहाता तालुक्यातील सर्व शिवसैनिक जमा झाले होते त्यात प्रामुख्याने कमलाकर कोते सचिन कोते संजय शिंदे तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. विरोध प्रदर्शन सुरू असतांनाच कमलाकर कोते यांसह सात ते आठ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

(लखन गव्हाणे – राहाता प्रतिनिधी)

Leave a Reply