रावसाहेब दानवे म्हणजे पाकिस्तान आणि चीनच्या सरहद्दीवर जन्मलेली पैदास – शिवसेनेची जहरी टीका

कर्जत येथे शिवसेनेच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला तसेच रावसाहेब दानवे यांचा उल्लेख पाकिस्तान आणि चीन यांच्या सरहद्दीवर जन्माला आलेली पैदास असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
केंद्र सरकारने तेल कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलची प्रचंड दरवाढ करून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कर्जत यांना पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी करावी अशी मागणी करत केंद्र सरकार आणि वादग्रस्त विधान करणारे रावसाहेब दानवे यांचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
(गणेश जेवरे – कर्जत प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *