माझ्या जीविताला धोका – विजयमाला माने यांची संरक्षणाची मागणी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणी आता पोलीस तपासातून वेगवेगळे खुलासे होत असतानाच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने यांनी आपल्या जीवाला धोका असून आपणास संरक्षण द्यावे अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी जेष्ठ पत्रकार बाळ बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिल्यामुळे खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे हे फरार झाले आहेत. आता या प्रकरणातील मुख्य साक्षीदार ज्या हत्येच्या वेळी रेखा जरे यांच्यासोबत कारमध्ये होत्या, त्या विजयामाला माने यांनी आज आपली भूमिका मांडली आहे.
(शुभम पाचारणे – अहमदनगर प्रतिनिधी)

Leave a Reply