बाळ बोठेंनी मयत रेखा जरे यांचा छळ केल्याचा मुलाचा आरोप

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली असून रेखा जरे यांच्या मुलाने आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. हत्येतील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हे मयत रेखा जरे यांचा छळ करत होते आणि कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी धक्कादायक माहिती निवेदनातून रेखा जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
मयत रेखा जरे यांचा २४ वर्षीय मुलगा रुणाल याने पोलिसांना सांगितलं कि बाळ बोठे यांनी माझ्या आईचा म्हणजे मयत रेखा जरे यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. आईसह आम्हालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती, आमच्या सर्व कुटुंबाला धोका असल्याचेही रुणाल याने म्हटले आहे.
बाळ बोठे यांचं आमच्या घरी नेहमी येणं-जाणं असायचं, आमच्या जीविताला काही धोका झाल्यास त्यासाठी बाळ बोठे यांना जबाबदार धरा असंही रुणाल याने म्हटलं आहे.

(अहमदनगर प्रतिनिधी,सी न्यूज मराठी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *