पठार भागात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील धनंजय सखाराम दुधवडे या तरूणाची अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून पोबारा केला आहे ही घटना नुकतीच घडली आहे.
हिवरगाव पठार शिवारातील पाणदरा येथील धनंजय दुधवडे या तरूणाकडे एम.एच १७ सी.जी ९६८६ ही पन्नास हजार रूपये किंमतीची दुचाकी होती. त्याने दुचाकी नेहमी प्रमाणे घरासमोर उभी केली होती मात्र अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून पोबारा केला आहे. दुधवडे यांनी दुचाकीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.
या प्रकरणी धनंजय दुधवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४३३/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाॅन्सटेबल सुरेश टकले हे करत आहे.

(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर घारगांव, ता.संगमनेर)

Leave a Reply