निवृत्ती महाराज इंदुरीकरांवर १६ डिसेंबरला होणार सुनावणी

प्रसिद्ध कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली असून या खटल्याची सुनावणी 8 डिसेंबरला होणार होती, मात्र कोर्टच रजेवर असल्याने सदर सुनावणी झालीच नाही. तर हि सुनावणी आज दि 9 डिसेंबरला झाली असून ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांना आता 16 डिसेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे. सरकारी वकिलांनी खटल्याच्या संदर्भात कोर्टात दाखल केलेली कागदपत्रे अपिलाच्या कामी बोलविण्यात यावे असा कोर्टाने हुकुम केला असून इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी प्रमाणित कागदपत्रे जिल्हा न्यायालयात दाखल करावे असा आदेश काढण्यात आला. सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड या खटल्याची तपासणी करणार आहेत. कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला होता. इंदुरीकरांतर्फे वकील के. डी. धुमाळ तर विरुद्ध बाजूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वकील रंजना गवांदे बाजू मांडत आहेत
(बाबासाहेब कडू, संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *