नगरमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेवर शिवसेनेची शाईफेक

नगर शहर शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. दानवे यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर , नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, संदेश कार्ले, गिरिष जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, विजय पठारे, संग्राम कोतकर, अमोल येवले, शाम नळकांडे, राजेंद्र भगत, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, दिपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
(शुभम पाचारणे – अहमदनगर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *