तृप्ती देसाई 10 डिसेंबरला शिर्डीत येणारच…….!

 शिर्डी संस्थानाने पोषाखा संदर्भात जो बोर्ड लावला होता त्या संदर्भामध्ये श्रद्धा आणि सबुरी म्हणून आम्ही आठ दिवसाची मुदत देऊन त्यांना बोर्ड काढण्यासाठी विनंती केली होती परंतु अजून त्यांनी कुठलाही तो बोर्ड काढलेला नाही आणि शिर्डीच्या प्रांत अधिकाऱ्यांकडून आम्हाला नोटीस येते की तुम्हाला शिर्डीमध्ये प्रतिबंध घालण्यात येतो म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ज्यांनी चुकीचे बोर्ड लावलेले आहेत त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेण्याचा भक्तांचा प्रयत्न  केलेला आहे त्यांच्यावर मात्र कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही त्यांच्यावर कुठली बंदी घातली जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर एक तर्फा कारवाई करून जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आमचा आवाज दाबला जाणार नाही त्यामुळे आम्ही जे आहे ते 10 डिसेंबरला शिर्डी मध्ये येणारच आहोत असे विधान भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केले आहे

(प्रतिनिधी – लखन गव्हाणे, राहाता)

Leave a Reply