तृप्ती देसाईंना शिर्डीत येण्यास मनाई

राहता तालुक्यातील शिर्डीमध्ये भाविकांनी सभ्य पोशाख परिधान करून साईसमाधीच्या दर्शनासाठी यावे अशा आशयाचे साईसंस्थानचे फलक काढून टाकण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई यांना पुढील दोन दिवस शिर्डीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबतची नोटीस जारी केली . कायदा- सुव्यवस्थेस बाधा येऊ नये यासाठी नऊ ते अकरा डिसेंबरदरम्यान देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे .
शिर्डीत येऊन आपण फलक असल्यास ते हटवू .असा इशारा देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला मात्र हे फलक भाविकांनी केलेल्या विनंती वरून फलक लावण्यात आले आहेत अशी माहिती उपअधीक्षक संजय सातव यांनी दिली. त्यामुळे हटविण्याचा प्रश्नच येत नाही असे साईसंस्थानने पोलिसांना कळविले होते. त्यातच देसाई शिर्डीत आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी यांनी दिला होता. या सर्व घडामोडींची दखल घेऊन देसाई यांना येथे येण्यास मनाई करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
(लखन गव्हाणे,राहाता प्रतिनिधी)

Leave a Reply