घारगावच्या पोलीस निरीक्षकपदी सुनील पाटील

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांची अहमदनगर मुख्यालयात बदली झाली आहे ,त्यांच्या जागी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची वर्णी लागली आहे,त्यांनी रविवारी दुपारी आपला पदभार स्वीकारला.
काही दिवसांपूर्वी त्यांचीही अहमदनगर येथे पोलिस मुख्यालयात बदली झाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार दिलाय.
जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे यांसह घारगावमधील नागरिकांनी रविवारी दुपारी नूतन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या तर आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात अंबादास भुसारे यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांना घारगाव ग्रामस्थांच्यावतीने निरोपही देण्यात आला.घारगावमध्ये काही दिवसांपासून चोऱ्या होत आहे यावर नूतन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना लक्ष केंद्रित करून या चोऱ्या रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
(बाबासाहेब कडू – संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply