गुंगीचे औषध पाजून १९ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

नाशिक जिल्ह्यातील एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर राहुरी शहरातील खळवाडी येथे राहणारा राधाकिसन रायभान बडदे याने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला आहे
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्‍यात राहणाऱ्या एका 19 वर्षीय महिलेला मुतखड्याचा त्रास जाणवत असल्याने आरोपी याने मुतखड्याचे औषध आहे आहे असे सांगून कोणते तरी गुंगीकारक औषध पाजून ही विवाहिता झोपेत असताना तिचे कपडे काढून नग्नावस्थेतील फोटो काढून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून तिचे व्हिडिओ काढून सदर फोटोच्या व व्हिडिओ शूटिंग च्या आधारे वेळोवेळी धमकावून या विवाहितेच्या वडील भाऊ नवरा यांच्या मोबाईलवर तिचे नग्नावस्थेतील फोटो व शरीर संबंध बाबतचे व्हिडिओ पाठवून तिची बदनामी केली व वेळोवेळी शारिरीक संभोग केला अशा आशयाची फिर्याद या 19 वर्ष महिलेने राहुरी पोलिसात दाखल केली असून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला राहुरी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे हे करत आहेत.

(सुहास जाधव,शरद पाचारणे – राहुरी प्रतिनिधी)

Leave a Reply