कोपरगावमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, २ तास धरणे आंदोलन

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक कृषि कायदा केला आहे कायदा मागे घेण्यासाठी  दिल्लीत सुरू असलेल्या  शेतकऱ्यांच्या अंदोलनाला, भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी  आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी,बुध्दीस्ट यंग फोर्स यांच्या वतीने कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्या जवळ  दोन तास धरणे अंदोलन करून काळ्या फिती बांधत केंद्रसरकारचा निषेध व्यक्त केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत केंद्र सरकारवर शाब्दिक प्रहार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी केद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आवाज उठवून निषेध व्यक्त केला.

या अंदोलनात  तालुक्यातील  विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवारी  सकाळपासुन शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वतः आपले व्यवहार बंद ठेवून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या अंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याने संपुर्ण बाजारपेठ बंद होती तर कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट होता.  या आंदोलनात पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, काळे साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन   राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चारूदत्त सिनगर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनिल गंगुले,नगरसेविका प्रतिभा शिलेदार माधवी वाकचौरे,राष्ट्रीय काँग्रेसच्या तालुका सचिव सविता विधाते,मादेवी खरे,फकिर मेहमूद कुरेशी, कृष्णा आढाव,राजेंद्र बोरावके,विजय त्रिभुवन, दिनेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान या अंदोलनात कोपरगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने सत्ताधारी पक्षाच्या एका प्रमुख गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी न दिसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकडे  सर्वांचे लक्ष लागले होते.

(शंकर दुपारगुडे – कोपरगाव प्रतिनिधी)

Leave a Reply