काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत झाल्याची माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखेंची टीका

महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटायला गेले तर महाराष्ट्राचं राजभवन हे राजकीय आखाडा होते. अशा प्रकारची टीका होते. टीका करणारी हीच मंडळी आता राष्ट्रपतींना जाऊन भेटतात. म्हणजे राष्ट्रपती भवन राजकीय आखाडा झाला का ? असा सवाल आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. संगमनेरमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
कृषिविषयक यूपीए सरकारच्या काळात आणलं गेलं. त्याचं समर्थन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी करायला लावलं होतं. केंद्र सरकार चर्चेला तयार आहे. सरकारची सकारात्मक भूमिका असताना सुद्धा हे आंदोलन करून आपलं राजकीय फलित साध्य करण्याची भूमिका काही मंडळींनी घेतली आहे. त्यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा त्यांना आता विसर पडला आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या भूमिकेचा विसर पडतोय. असा आरोप त्यानी केला.
काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाला आहे. याचे वाईट वाटते. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा पक्ष किती अधोगतीला गेला आहे. ते पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दुःख होईल. काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असा टोला त्यानी लगावला आहे.
(बाबासाहेब कडू – संगमनेर प्रतिनिधी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *