कर्जतमध्ये पोलीस पाटलाच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू

कर्जत तालुक्यातील भोसा या गावामधील पोलीस पाटील यांच्या वडिलांचा मध्यरात्री संशयास्पदरीत्या मृत्यू झाला असून ती घटना खून असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट दिली आहे.
कर्जत तालुक्यातील भोसे येथील साहेबराव मुक्ताई चव्हाण वय 70 वर्ष हे घराच्या पडवीमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेले असताना मध्यरात्री त्यांच्या पत्नीने त्यांना खाली पडलेले पाहिले. यानंतर तिने घरातील सर्व नातेवाईकांना उठवला असता साहेबराव चव्हाण यांच्या अंगामधून रक्त येत असल्याचे दिसले त्याचप्रमाणे घराच्या अंगणामध्येही रक्त सांडले दिसून आले आहे. यानंतर ही माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलिस पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नेण्यात आला आहे. दरम्यान त्यांचा मृत्यू संशयास्पद असून त्यांचा खून झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.
(गणेश जेवरे – कर्जत प्रतिनिधी)

Leave a Reply