अकोलेतही भारत बंदला पाठींबा, सर्व व्यवसाय बंद

केंद्राने लादलेले जाचक आणि जुलमी कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी आणि कामगार एकवटले असून आज मंगळवारी भारत बंद पुकारण्यात आला आहे आणि या बंदला अकोलेतही १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. तर बसस्थानक परिसरात सर्वपक्षीयांनी एकत्रित येत केंद्राच्या शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
बंद यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, शेतकरी नेते डॉ.अजित नवले,कॉम्रेड कारभारी उगले यांसह अनेकांनी परिश्रम घेतले. शहरासह तालुक्यातही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शवला.
(सी न्यूज मराठी अकोले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *